पुणे- मान्सूनची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. येत्या ७२ तासांत केरळात मान्सूनचे आगमन होणार आहे. साधारण ६ किंवा ७ जूनला मान्सून केरळात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सूनसाठी अरबी समुद्रातील वाऱ्याची अनुकूलता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ढगही जमा होऊ लागले आहेत.
मान्सून आला रे..! येत्या ७२ तासात केरळात होणार दाखल - farmer
येत्या ७२ तासांत केरळात मान्सूनचे आगमन होणार आहे. साधारण ६ किंवा ७ जूनला मान्सून केरळात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्यावर साधारण ६ दिवसात राज्यात दाखल होतो. त्यामुळे १२ तारखेला राज्यात मान्सून बरसेल. मात्र, वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वीही पावसाची शक्यता आहे. देशात यंदा ९६ टक्के म्हणजे सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तर राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
सध्याची मान्सूनची अनुकूल परिस्थिती पाहता राज्यात यंदा १०० टक्के पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर येत्या ४८ तासांत विदर्भातील उष्णतेची लाट (हिट वेव) कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.