महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune GST fraud : जीएसटीने पुण्यातील व्यापार्‍याला केली अटक, 13 कोटींचा घोटाळा उघड

वस्तू आणि सेवा कर विभागाकडून ( Service Tax Department ) कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ( merchants ) शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत 27 व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

By

Published : Jul 16, 2022, 9:27 AM IST

पुण्यात GST कारवाई
पुण्यात GST कारवाई

पुणे - बनावट बिलांच्या आधारे वस्तू आणि सेवा कर विभागाची ( Service Tax Department ) ( जीएसटी GST ) 13 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी शिव स्टील ट्रेडर्स कंपनीचे मालक दौलत शिवलाल चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाकडून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ( merchants ) शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत 27 व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. बनावट बिलांद्वारे फसवणूक ( Fraud ) करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर विशेष मोहिम आखण्यात आली आहे.

शिव स्टील ट्रेडर्स ( SHIVA STEEL TRADERS ) या कंपनीच्या व्यवहारांबाबत जीएसटी ( GST ) कार्यालयातील विशेष पथकाला माहिती मिळाली होती. तपासणीत या कंपनीने कोणत्याही वस्तुची प्रत्यक्ष विक्री तसेच खरेदी केली नसल्याचे आढळून आले होते.

जीएसटी पुणे विभाग कार्यालयाकडून आतापर्यंत 6 व्यापाऱ्यांना अटक -सखोल तपासणीत कंपनीने 13 कोटी 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त ( अन्वेषण ) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त ऋषीकेश अहिवळे, चंदर कांबळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे आदींनी कारवाई केली आहे. चौधरी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करचुकवेगिरी प्रकरणात जीएसटी पुणे विभाग कार्यालयाकडून आतापर्यंत 6 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

याआधी गुंदेचा मालक याला अटक -याप्रकरणी आता कंपनीचा मालक गुंदेचा याला अटक करण्यात आली आणि बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असे विभागाने सांगितले आहे. यासह चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्य जीएसटी विभागाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 10 आरोपींना अटक केली आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. फसवणूक, करचुकवेगिरीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी विभाग कोणतीही कसर सोडणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -Explanation by Uday Samant : 'जे झालं ते जोडण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हता...', उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details