पुणे -गेल्या १५ महिन्यांपासून कोरोनासारख्या महासंकटाचा सामना करत असताना पुणे शहराला त्याच्यातून बाहेर काढण्याचा काम हे महापालिकेने केले आहे. या महापालिकेच्या कामाचा कौतुक सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार यांनी स्वतः हा केले. मग मला असे वाटतंय कि अजित दादाच्या मतांशी ताई सहमत नाही, असा टोला पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे. आंबिल ओढा प्रकरणावरून आता पुण्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. या कारवाईमागे नेमके कोण आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे, असा दावा आता भाजपा नेते करत आहेत. तर झेपत नसेल तर राजीनामा द्या, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी महापौरांवर निशाणा साधला आहे. यावर आत्ता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल (गुरूवार) आंबील ओढ्यात जी कारवाई करण्यात आली आहे, ती कारवाई महापालिका प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली घाईघाईत केली आहे. हे आत्ता पुणेकरांना समजले आहे आणि आंबील ओढ्यातील नागरिकांनाही समजले आहे. कदाचित सुप्रियाताईनाही हे कळाले असल्याने त्यांनी या मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा आरोप केला आहे. वास्तवाची थोडी माहिती सुप्रिया सुळे यांनी घ्यावी, असेही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
'असे वक्तव्य करणे चुकीचे'