पुणे दुर्घटना : महापौर मुक्ता टिळक यांचे विकासकाला त्वरित काम थांबविण्याचे आदेश - pune mayor
कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला.
पुणे- कोंढवा परिसरात भिंत कोसळून दुर्दैवी घटना घडली. यात १५ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेला जबाबदार कोण यावरून प्रश्न निर्माण झालेला आहे. याप्रकरणी महापौर मुक्ता टिळक यांनी विकासकाला त्वरित काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात मुक्ता टिळक म्हणाल्या, की इमारतीसाठी वाजवीपेक्षा जास्त खोदकाम झाले आहे का? याची तपासणी करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच जोपर्यंत या दुर्घटनेचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे काम पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेच्या वतीने विकासकाला देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना लवकरच मदत देण्यात येणार आहे, असेही ते यावेळी म्हणाल्या.
कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला. अग्निशामक दलाला ठिगाऱ्यांखालून ३ जणांना जिवंत काढण्यात यश आले आहे.
आल्कर स्टायलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. ४ फुट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भिंतीच्या खालच्या बाजूला मजूरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करून शोधकाम करण्यात येत होते.
वरून पडणारा पाऊस आणि खोदकाम यामुळे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली़ भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सर्व जण गाडले गेले. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली असून प्रथमदर्शनी या घटनेत बिल्डर, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचे दिसत आहे.