पुणे -पिंपरी चिंचवड शहरातून शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा उर्फ माई ढोरे ( BJP's Mai Dhore Pimpri-Chinchwad mayor ) यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि त्यांना मायदेशी सुखरूप आणण्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कार्यालयाशी बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितले.
शहरातील आदित्य काची, गायत्री पोरे आणि मृणाल पांडे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये युद्धामुळे अडकून पडले आहेत. त्यांच्याशी महापौर ढोरे तसेच स्वीकृत नगरसदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी संवाद साधून त्यांना धिर दिला. युक्रेन आणि रशिया यांच्यात तणावाच वातावरण असून युद्ध सुरू आहे. त्यात अनेकांचा बळी गेला आहे. याचा थेट फटका भारतीय विद्यार्थाना बसला आहे. हजारो विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकलेले आहेत.