महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाने साकारली पेशवाईची साक्ष देणाऱ्या 'शनिवारवाड्या'ची प्रतिकृती - Hutatma Babu Genu mandal News

पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाने शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारली आहे. हा देखावा 111 फूट उंच 200 फूट लांब आणि 40 फूट रुंद असा बनवण्यात आला आहे.

हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा देखावा

By

Published : Sep 5, 2019, 8:27 PM IST

पुणे -हुतात्मा बाबू गेनू मंडळाने पेशवाईची साक्ष देणाऱ्या 'शनिवारवाड्या'ची प्रतिकृती' साकारली आहे. कला-दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या वाड्याची निर्मिती केली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या शनिवारवाड्याचा दरवाजा ही फक्त वाड्याची तटबंदी आहे. 111 फूट उंच 200 फूट लांब आणि 40 फूट रुंद असा हा देखावा बनवण्यात आला आहे.

हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा देखावा

हा भव्यदिव्य देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मुख्य दरवाजा, तटबंदी बुरुज पाण्याचे हौद असून, त्यात रंगीबेरंगी कारंजी बनवण्यात आल्या आहेत. मुख्य दरवाजाजवळ दोन सालंकृत गजराज आहेत. भरजरी रत्नजडीत पडदे, घंटा, आरसे, झुंबर, शाही पद्धतीने सजवलेला 'गणेश महाल' असे या देखाव्याचे स्वरूप आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details