महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Meteorologist Department : राज्यात 3 आणि 4 फेब्रुवारीला पावसाची शक्यता, शेतकऱ्यांचे होऊ शकते नुकसान - Weather Changes

मागील तीस वर्षांत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची नोंद अति थंड आठवडा म्हणून झाली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे ( Meteorologist ) यांनी दिली. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात वातावरण बदल होत आहे. या वातावरणीय बदलामुळे राज्यात थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने ( Meteorologist Department ) व्यक्त केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jan 30, 2022, 4:34 PM IST

Updated : Jan 30, 2022, 7:31 PM IST

पुणे- मागील तीस वर्षांत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची नोंद अति थंड आठवडा म्हणून झाली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे ( Meteorologist ) यांनी दिली. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात वातावरण बदल होत आहे. या वातावरणीय बदलामुळे राज्यात थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने ( Meteorologist Department ) व्यक्त केली आहे. 3 आणि 4 फेब्रुवारीला राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामान ( Cloudy Weather ) राहण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या वातावरणीय बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानात जे बदल ( Weather Changes ) सध्या होत आहेत त्याला प्रदूषण ( Pollution ) हे मुख्य कारण असल्याचेही साबळे म्हणाले.

बातचित करताना प्रतिनिधी
Last Updated : Jan 30, 2022, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details