पुणे -मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे याबाबत भाषा अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांनी आपली मते मांडली. पठारे समितीची शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा असावा यासाठी समिती नेमली होती. कोणतीही भाषा अभिजात भाषा असावी यासाठी तीन निकष ठेवले होते. त्या भाषेला इतिहास किमान दीड हजार वर्षाचा असावा. त्यामध्ये खंड पडलेला असू शकेल. पण, तरीदेखील ती भाषा जुनी असली पाहिजे. त्या भाषेमध्ये जागतिक महत्त्वाची साहित्यनिर्मिती झाली पाहिजे. मराठी भाषेच्या बाबतीत हे तीनही निकष पूर्ण झाले आहेत.
दोन हजार वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात जर कोणती भाषा बोली जायची तर ती प्राकृत भाषा बोलली जात होती. त्याला महाराष्ट्री प्राकृत भाषा, असे म्हणतात. त्यामध्ये गाथा सप्त सही हा फार मोठा ग्रंथ हा सातवाहन या राजाने निर्माण केला होता. त्या ग्रंथापासून महाराष्ट्री प्राकृत भाषेची परंपरा सुरू झाली. त्यामध्ये कालमानाने काही बदल होत आले आहेत. मात्र ,आपण जे मराठी बोलतो त्याचे मूळ हे इतके जुने आहे. या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांच्या गाथा, मध्ययुगीन साहित्य, आधुनिक विचारवंतांचे साहित्य, जागतिक महत्त्वाचे वाङ्मयवर या भाषेत निर्माण झालेला आहे.