महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या 'माझे मातीचे गायन' या कवितेचे वैभव जोशी यांच्याकडून सादरीकरण - माझे मातीचे गायन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी कवी गझलकार वैभव जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'साठी कुसुमाग्रज यांची 'माझे मातीचे गायन' ही कविता सादर केली. कवी कुसुमाग्रज यांचा जयंती हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे. हीच परंपरा पुढे आजच्या काळातील कवी वैभव जोशी यांसह अनेकजण समर्थपणे सांभाळताना दिसत आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Feb 27, 2022, 11:03 AM IST

पुणे - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी कवी गझलकार वैभव जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'साठी कुसुमाग्रज यांची 'माझे मातीचे गायन' ही कविता सादर केली. कवी कुसुमाग्रज यांचा जयंती हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे. हीच परंपरा पुढे आजच्या काळातील कवी वैभव जोशी यांसह अनेकजण समर्थपणे सांभाळताना दिसत आहे.

कविता सादर करताना

वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. कुसुमाग्रज म्हणजेच कुसुमचा अग्रज अर्थात कुसुमचा मोठा भाऊ येथे अर्थ अभिप्रेत आहे. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांचा जन्म दिवस ( दि. 27 फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा -Raj Thackeray's in Pune : आम्ही देखील साहित्य प्रेमी पण.... पुण्यात राज ठाकरेंची फटकेबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details