पुणे - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणे, ही दुर्दैवी बाब आहे. राज्य सरकारने प्रयत्न करावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मराठा क्रांती आरक्षणासाठी राज्य सरकारने न्यायालयात केलेले प्रयत्न अपुरे पडले आहेत. राज्य सरकारने फेरयाचिका दाखल करावी, असे मत कोंढरे यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षणाकरिता राज्य सरकारने प्रयत्न करावेत संबंधित बातमी वाचा-मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
ते म्हणाले, की मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांच्या भविष्यात अंधकार निर्माण झाला आहे. घटनापीठाची मागणी मान्य झाली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून दोन्ही आरक्षण संरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे जर झाले नाही तर, मराठा क्रांती मोर्चा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
हेही वाचा-भारत-चीन सीमेजवळील 'या' गावात एकही कोरोना रुग्ण नाही