ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 'ओशाळला मृत्यू'; मृतदेहावरून गेली अनेक वाहने - cycle rider accident in Pune district

Pune Solapur highway accident

Pune Solapur highway accident
पुणे-सोलापूर महामार्ग अपघात
author img

By

Published : Mar 6, 2021, 10:15 PM IST

पुणे- पाटस गावातील त्रिमूर्ती मंगल कार्यलयानजीक पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सायकलस्वराला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला. मात्र, मागील वाहने थांबलीच नाहीत. मृतदेहावरून अनेक वाहने गेली आहेत.

अंगावरून अनेक वाहने केल्याने सायकलस्वाराचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला. यामुळे इथे माणुसकी ओशाळली अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा-'आई मला माफ कर, तुझी लाडकी...' पत्र लिहून क्लासवन महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

सायकलस्वाराचा जागीच मृत्यू-

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अपघात घडला आहे. हा सायकलस्वार पाटसवरून वरवंडच्या दिशेने जात होता. अपघाताबाबत माहिती मिळताच पाटस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र मृतदेहावरून अनेक वाहने गेल्याने मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता.

हेही वाचा-आरोपपत्र रियाला अडकवण्यासाठी तयार केले गेलेले - वकील

संपर्क साधण्याचे आवाहन

सायकलस्वाराची ओळख अद्याप पटली नाही. कोणी मृत व्यक्तीला ओळखत असल्यास पाटस पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details