पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१४ ला शिवसेनेचा प्रस्ताव घेऊन काँग्रेसकडे आले ( Manikrao Thackeray On Eknath Shinde ) होते. अशोक चव्हाण बोलतायत ते खरं आहे, पण त्यावेळेस राष्ट्रवादीची नेमकी भूमिका कळाली नाही आणि त्याने भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा दिल्याने भारतीय जनता पार्टीचे सरकार आले नाही. त्यावेळेसच महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता तर सरकार आले असते, असे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे ( Former president of Congress Manikrao Thackeray ) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. ( Congress Bhawan in Pune )
अशोक चव्हाण जे सांगतात ते अगदी खरे :2014 ला राज्यस्तरावर ही चर्चा झाली होती. त्यावेळी मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे हे आमच्याकडे प्रस्ताव घेऊन आले होते. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीची भूमिका समोर येऊ शकली नाही आणि त्यामुळे चर्चा पुढे होऊ शकले नाही. परंतु ही चर्चा राज्यस्तरावर झाली होती आणि अशोक चव्हाण जे सांगतात ते अगदी खरं आहे. त्यावेळी पवार साहेबांची ही भूमिका मला समजली नाही आणि त्यामुळे तो प्रस्ताव तिथेच राहिला असे माणिकराव ठाकरे म्हणाले. 2014 ला काही शिवसेनेचे आमदार काँग्रेसमध्ये येणार अशी काही चर्चा नव्हती. परंतु शिवसेनेचा प्रस्ताव मात्र काँग्रेसकडे आलेला होता आणि मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यावेळी चर्चाही झाली होती. ती चर्चा प्राथमिक स्वरूपात होत असल्याचे असं माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.