महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Man Killed his Step Daughter in Pune : डोकं आपटून केली मुलीची हत्या, सावत्र पित्यास अटक - डोके आपटून केली मुलीची हत्या

एका चिमुकलीच्या सावत्र वडीलाने अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीचे डोके भिंतीवर आपटत बेदम मारहाण करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली आहे. मारहाणीनंतर सावत्र पित्याने मुलगी पडल्याने जखमी झाल्याचे सांगत रुग्णालयात दाखल केले होते. पण, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तसेच मुलीचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवाला समोर आले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी ( Bharti Vidyapeeth Police ) आरोपीला बेड्या ठोकल्या.

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे

By

Published : Apr 17, 2022, 8:17 PM IST

Updated : Apr 17, 2022, 10:06 PM IST

पुणे -एका चिमुकलीच्या सावत्र वडीलाने अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीचे डोके भिंतीवर आपटत बेदम मारहाण करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ( Bharti Vidyapeeth Police ) मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत आरोपी जितेंद्र उत्तम पाटील याला अटक केली आहे.

याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी ( Bharti Vidyapeeth Police ) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व जितेंद्र पाटील यांचा लग्न 4 महिन्यापूर्वी झाला होता. ते कात्रज भागातील आंबेगाब बुद्रुक या ठिकाणी राहत होते. मात्र, त्या मुलीचा जन्म अनैतिक संबंधातून झाल्याच्या संशयावरून जितेंद्रने मुलीला मारहाण करत तिचे डोके भिंतीवर आपटत तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रुग्णालयात दाखल करताना मुली पडल्याने ती जखमी झाल्याचे जितेंद्रने सांगितले होते. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात तिचा मृत्यू बेदम मारहाण केल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी जितेंद्रला अटक केली आहे.

हेही वाचा -Husband forced for rape : पतीने शेतमालकाला पत्नीवर करायला लावला सामुहिक बलात्कार

Last Updated : Apr 17, 2022, 10:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details