महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Hit And Run : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भरधाव येणाऱ्या चारचाकीने एकाला चिरडले; आरोपीला अटक - पुणे मार्केट यार्ड हिट अॅड रन केस

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ( Road Accident At Market Yard ) रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरून कार गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू ( Market Yard Hit And Run ) झाल्याची घटना घडली आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एकाला ( Police Arrest One In Hit And Run Case ) अटक केली आहे.

Pune Hit And Run
Pune Hit And Run

By

Published : Apr 27, 2022, 7:09 PM IST

पुणे -पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ( Road Accident At Market Yard ) रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरून कार गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू ( Market Yard Hit And Run ) झाल्याची घटना घडली आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एकाला ( Police Arrest One In Hit And Run Case ) अटक केली आहे. 20 एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पोलीसांनी अनुप मेहता नावाच्या व्यावसायिकाला अटक केली आहे.

नेमक काय घडलं? -अनुप मेहता हे पुण्यातील व्यवसायीक असून ते 20 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातून जात असताना त्यांच्या कारने एका अज्ञात व्यक्तीला चिरडले. त्यात ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेंव्हा अनुप मेहता हे स्वतः गाडी चालवत होते. ही घटना घडल्यानंतर लगेचच मेहता हे घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर मार्केटयार्ड पोलिसांत या संदर्भात गुन्हा दाखल झाला. पोलीस तपासात या घटनेत ज्या कारने त्या व्यक्तीला चिरडले ती कार मेहता यांच्या मालकीची किया सेल्टास कार एमएच 12 एस क्यू 9425 या क्रमांकाची कार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करत अनुप मेहता याला अटक केली.

हेही वाचा-Sanjay Raut : राजभवन गुन्हेगारांना संरक्षण कसे देते?, संजय राऊतांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details