पुणे -नांदेड फाटा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडली आहे. संजीव दिगंबर कदम (40) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या दोन्ही मुलांचे (एक मुलगा व एक मुलगी) एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून ते नैराश्यात होते.
मुलांच्या निधनापासून होते नैराश्यात -
मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा व दहा वर्षांची मुलगी या दोघांचेही काही दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. दोन्ही मुलांच्या निधनापासून कदम हे निराश राहायचे. मुलांच्या विरहामुळे नैराश्यातून कदम यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.