पुणे- दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्याचा जाब विचारल्याने चक्क कानाला चावा घेत तुकडा पाडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अभिजित गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जखमी कौतुभ महेंद्र गोळे वय-२६ यांनी फिर्याद दिली आहे.
दुचाकीला पाडल्याचा जाब विचारल्याने कानाला चावा घेऊन पाडला तुकडा - bike
याप्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अभिजित गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौतुभ महेंद्र गोळे यांची इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केलेली होती. आरोपी हा त्यांच्या दुचाकीशी खोडसाळपणा करत होता. हे फिर्यादी यांच्या पत्नीने पाहिले आणि फिर्यादी पतीला जाऊन सांगितले. तेव्हा, आरोपी अभिजितने दुचाकीला लाथ मारून खाली पाडले. त्याबाबत फिर्यादी कौतुभ यांनी विचारणा केली असता आरोपी अभिजितने त्यांच्या कानाचा चावा घेत तुकडा पाडला.
जखमी कौतुभ यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार केले असून त्यांनी निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे. तसेच आरोपी अभिजितने फिर्यादी यांच्या पत्नीला देखील मारहाण केली आहे. आरोपीला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.