महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune ATS Arrested Man Police Custody : टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपीला ३ जून पर्यंतची कोठडी - पुणे एटीएस कारवाई

पुणे दहशतवादी विरोधी पथकाने आज सकाळी जुनेद मोहोम्मद या 28 वर्षीय तरुणाला दहशतवादी फंडिंग प्रकरणात दापोडी परिसरातून अटक केली होती. हा तरुण जम्मू काश्मीरमधील गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune ATS Arrested Man Police Custody
टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपीला ३ जून पर्यंतची कोठडी

By

Published : May 24, 2022, 6:27 PM IST

Updated : May 24, 2022, 7:18 PM IST

पुणे -पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ( Pune Anti Terrorism Squad ) दापोडी परिसरातून एका तरुणाला मंगळवारी (दि. 24 मे) अटक केली होती. जुनेद मोहम्मद ( वय 28 वर्षे), असे त्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. या अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. त्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 3 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे आहे.

पुणे दहशतवादी विरोधी पथकाने आज सकाळी जुनेद मोहोम्मद या 28 वर्षीय तरुणाला दहशतवादी फंडिंग प्रकरणात दापोडी परिसरातून अटक केली होती. हा तरुण जम्मू काश्मीरमधील गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. या अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता.

टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपीला ३ जून पर्यंतची कोठडी

काय म्हणाले वकील - या प्रकरणी माहिती देताना आरोपीचे वकील यशपाल पुरोहित यांनी माहिती दिली आहे, आरोपीला फंडिंग नेमक कुठून होत होत? त्याचबरोबर त्याने कुठली रेखी केली आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच आरोपी 2020मध्ये दहशतवादी गटाशी कनेक्ट झाला होता. आणि 2021 मध्ये त्याचा ब्रेन वॉश करण्यात आला असून तो काश्मीरला 3 वेळा जाऊन आला आहे. दोन वर्षात तो तब्बल ६ वेळेस काश्मीरला गेला असल्याचे देखील वकिलांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण -पुणे दहशतवादी विरोधी पथकाने आज सकाळी दापोडी येथून एकाला अटक केली होती काश्मीर येथील एका संघटनेकडून त्याला फंडिंग देण्यात आली होती, असा आरोप आरोपीवर करण्यात आला होता. गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. मात्र, हे पैसे त्याला कुठल्या कामासाठी देण्यात आले होते. हे मात्र अजून उघड झाले नसल्याचे देखील पुणे एटीएसने सांगितले आहे.

पुणे एटीएसकडून आरोप - सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता. मात्र 'या' पैशातून दहशतवादी कारवाई होणार असल्याचा आरोप पुणे एटीएसकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा - Pune ATS : टेरर फंडींग प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून एकाला अटक

Last Updated : May 24, 2022, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details