महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करा; नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली साहित्यिकांची बैठक

मराठी भाषा शिक्षणाचा कायदा तयार करण्यासाठीचा मसुदा कशा पद्धतीने असावा. तसेच त्यात कायद्याच्या कुठल्याही त्रुटी राहू नये या दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

By

Published : Jul 10, 2019, 4:49 PM IST

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली साहित्यिकांची बैठक

पुणे - मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, विधिज्ञ भास्करराव आव्हाड तसेच ज्येष्ठ विचारवंत उपस्थित होते.

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली साहित्यिकांची बैठक

या बैठकीमध्ये मराठी भाषा शिक्षणाचा कायदा तयार करण्यासाठीचा मसुदा कशा पद्धतीने असावा. तसेच त्यात कायद्याच्या कुठल्याही त्रुटी राहू नये या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. हा मसुदा बिनविरोध असावा या दृष्टीने सर्व अंगांचा विचार झाला पाहिजे असे या बैठकीत ठरविण्यात आले. याबैठकीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या मसुद्याला 15 जुलैला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच समाज माध्यमांमध्ये प्रसारित केले जाणार आहे. तसेच मराठी जाणकारांकडून या मसुद्यावर अभिप्राय, सूचना व हरकती मागविल्या जाणार आहेत.

15 ऑगस्ट पर्यंत या सूचना पाठवायचे आहे. आणि आलेल्या सूचना व हरकतींवर समिती विचार करेल. सुधारित मसुदा हा 20 ऑगस्टला सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यांमध्ये मराठी भाषा शिक्षणात सक्तीची करावी या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details