पुणे- शहराजवळील वाघोली येथे एका प्लॅस्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. एका मोकळ्या मैदानामध्ये चारी बाजूंनी पत्रे मारून आत मध्ये प्लास्टिक ठेवण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री अचानक या गोडावूनला आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. रात्रीची वेळ असल्यामुळे हे गोडाउन बंद होते, त्यामुळे याठिकाणी कोणीही कामगार नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
पुण्यात प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग प्लास्टिकमध्ये राहिलेल्या केमिकल मुळे आग ?
वाघोलीतील एका मोकळ्या मैदानावर एक पत्रे मारून गोडावून तयार करण्यात आले आहे. यामध्ये भंगार साहित्यसह प्लास्टिकचा ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यातील प्लास्टिकला अचनाक आग लागली. गोदामात सर्व प्लास्टिक आणि भंगार असल्यामुळे पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या घनटेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ही आग इतरत्र पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी काटेकोरपणे प्रयत्न करत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.