महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना काळात मानसिक आरोग्य सांभाळणे महत्वाचे; वाढत्या आत्महत्यांवर मानसोपचार तज्ज्ञांची प्रतिक्रिया - पुणे शहर आत्महत्या प्रकरण

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाढत्या आत्महत्या, ही चिंतेची बाब आहे. या आत्महत्यांची कारणे अनेक सांगितली जात आहेत. परंतु, सातत्याने वाढणाऱ्या या घटना रोखणे हे समाजापुढील मोठे आव्हान बनले आहे.

Psychiatrist Aarti Pendse
मानसोपचार तज्ज्ञ आरती पेंडसे

By

Published : Jun 19, 2020, 6:03 PM IST

पुणे - शहरात शुक्रवारी एकाच कुटुंबातील एका दाम्पत्याने त्यांच्या दोन बालकांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सुखसागर नगर येथे घडली होती. शुक्रवारी धायरी परिसरात एका 45 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका संगणक अभियंत्यासह तीन जणांनी आत्महत्या केली होती.

एकंदरीतच पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाढत्या आत्महत्या, ही चिंतेची बाब आहे. या आत्महत्यांची कारणे अनेक सांगितली जात आहेत. परंतु, सातत्याने वाढणाऱ्या या घटना रोखणे हे समाजापुढील मोठे आव्हान बनले आहे.

मानसोपचार तज्ज्ञ आरती पेंडसे यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा...मराठी पाऊल पडते पुढे...! महेश भागवतांची तेलंगाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती

शहर आणि परिसरात वाढत्या आत्महत्या या तणाव आणि नैराश्यातून होत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्योग धंद्यावर याचा परिणाम झाला आहे. नोकरीची शाश्वती राहिली नाही, अशा बाबी नागरिकांच्या चिंता वाढवणाऱ्या ठरत आहेत.

तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच नागरिकांची आर्थिक कोंडी वाढली आहे. लॉकडाऊन अनलॉक होत असले तरिही कोरोनाची धास्ती आहे. याच सर्व परिस्थितीमुळे नैराश्य आणि तणाव वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी नैराश्यातून बाहेर पडण्याचे उपाय अवलंबले पाहिजे. जवळच्या व्यक्तीशी संवाद वाढवला पाहिजे. आजच्या परिस्थिती घाबरून न जाता, निराश न होता पर्यायी मार्ग शोधण्याची धडपड केली पाहिजे. हे संकट जाणार याची खात्री बाळगली पाहिजे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ आरती पेंडसे यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details