महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आम्ही दोन वर्ष पूर्ण करत आहोत, आता पुढचे ३ वर्षही पूर्ण होणार - बाळासाहेब थोरात - balasaheb thorat pune

आमचे सरकार दोन वर्ष पूर्ण करत आहोत. आता राहिलेले पुढचे ३ वर्षही पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

balasaheb thorat
बाळासाहेब थोरात

By

Published : Sep 25, 2021, 8:54 PM IST

Updated : Sep 25, 2021, 9:58 PM IST

पुणे -सरकार बिलकुल बदलणार नाही..असं म्हणता म्हणता दोन वर्ष निघून गेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासून संकेत देत होते की ते परत येणार. पण, आम्ही दोन वर्ष पूर्ण करत आहोत. आता राहिलेले पुढचे ३ वर्षही पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

हेही वाचा -CORONA VIRUS : राज्यात शनिवारी 3,276 नवे रुग्ण, 58 रुग्णांचा मृत्यू

  • तीन सदस्यीय प्रभागाचा बुधवारी फेरविचार -

महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय आहे. पण त्यात मतमतांतरे असू शकतात, त्यामुळे येत्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर फेरविचार होऊ शकतो, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे, तसेच काही मते वेगळी असणेही शक्य आहे. मंत्रिमंडळात निर्णय झाला त्यावेळी एकमतानेच झाला. नंतर यावर झालेल्या चर्चेत काही जणांची मते वेगळी असल्याचे लक्षात आले. त्याचाही विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे बुधवारी यावर फेरविचार होऊ शकतो, असेही थोरात यावेळी म्हणाले.

  • भाजप पुन्हा येणार नाही -

रावसाहेब दानवे यांना जास्त गंभीर घेऊ नका. हे दोन वर्ष बोलत होते. अजून तीन वर्ष बोलतील. परत भाजप येणार नाही हे नक्की सांगतो, असे देखील यावेळी थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा -हवामान खात्याचा इशारा: उद्यापासून राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated : Sep 25, 2021, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details