पुणे - महाराष्ट्र दिनाचे ( Maharashtra Day ) औचित्य साधत महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात शनिवारी (दि. 30 एप्रिल) महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभेचे ( Maharashtra Sadbhavana Nirdhar Sabha ) आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार असून या सभेत केंद्र सरकारच्या विरोधात काही ठराव मांडणार येणार आहे. यामध्ये मनसे व भाजप व्यतिरिक्त सर्वपक्षिय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारवर आरोप -देशांमध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी सरकार घेत आहे. त्यामुळे आपल्या राज्यघटनेलाच सुरुंग लागत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.