महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sugarcane Production : महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऊसाचे विक्रमी उत्पादन; देशात प्रथम तर जगात तिसऱ्या स्थानी

यावर्षी ऊसाच्या उत्पन्नात महाराष्ट्र राज्य (Sugarcane Production Increasing) देशात पहिल्या, तर जगात तिसऱ्या स्थानी आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याने सगळ्या जगाला चकित केले आहे. यावर्षीच्या हंगामात राज्यात तब्बल 111 लाख टन इतक्या ऊसाचे उत्पन्न झाले आहे.

sugarcane
ऊस फाईल फोटो

By

Published : Mar 22, 2022, 4:23 PM IST

Updated : Mar 22, 2022, 5:26 PM IST

पुणे - महाराष्ट्र राज्य (Maharashtra) हे जगात शेती संपन्न राज्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यावेळेस कारण ठरले आहे ते राज्यात यंदा झालेले विक्रमी ऊस उत्पन्न (Sugarcane Production Increasing). यावर्षी ऊसाच्या उत्पन्नात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या, तर जगात तिसऱ्या स्थानी आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याने सगळ्या जगाला चकित केले आहे. यावर्षीच्या हंगामात राज्यात तब्बल 111 लाख टन इतक्या ऊसाचे उत्पन्न झाले आहे.

इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी उत्पन्न -

राज्यात यंदा ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. ऊसाच्या उत्पन्नात महाराष्ट्र राज्याने देशात पहिल्या, तर जगात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. साखर कारखाने सुरू झाल्यापासून शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पन्न आले आहे. यावर्षीच्या हंगामात राज्यात तब्बल 111 लाख टन इतक्या ऊसाचे उत्पन्न झाले आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत साधलेला संवाद

या कारणांमुळे राज्यात ऐतिहासिक ऊस उत्पादन -

राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादनाची ही पहिलीच वेळ आहे. या ऊस उत्पादनामागे अनेक कारण असल्याची माहिती समोर येत आहे. ब्राझीलमध्ये पडलेला दुष्काळ तसेच भारताने साखरेचे उत्पन्न कमी करत इथेनॉलकडे वळण्याचा घेतलेला निर्णय, त्याचबरोबर साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले दर, राज्यात कारखान्यांची वाढलेली कॅपॅसिटी अशी अनेक कारणे या ऊस उत्पादन वाढीसाठी निर्णायक ठरली आहेत.

साखर उत्पादनात एक नंबरला ब्राझील, दोन नंबरला युरोपियन युनियन तर तीन नंबरला महाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे.

साखर आयुक्तालयाकडून साखर कारखान्यांचे रँकिंग

या सगळ्याबरोबरच राज्यातील साखर आयुक्तालयाने राज्यात असणाऱ्या साखर कारखान्यांचे रँकिंग केले आहे. ही रँकिंग करत साखर आयुक्तालयाने कारखान्याची एक लिस्ट पब्लिक डोमेनमध्ये प्रसारित केली आहे. या सगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांना आपला ऊस जाईल असा विश्वास आहे.

सद्यस्थितीला राज्यातले 197 साखर कारखाने सुरू -

सद्यस्थितीचा विचार केला असता, राज्यातील एकूण 197 साखर कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये 98 खासगी, 97 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. हंगाम संपायला अजून दीड महिन्याचा अवधी असल्याने.उसाचे उत्पन्न आणखीन वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्न 125 लाख टनापर्यंत जाईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. हा गेल्या शंभर वर्षातील रेकॉर्ड असल्याचे सांगतच भारतातून होणाऱ्या साखरेच्या निर्यातीत 90 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा असेल, अशी माहिती देखील राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

Last Updated : Mar 22, 2022, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details