महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी बहुमत चाचणीत पास होणार?; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आगे आगे देखो... - नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे

आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही नक्की टिकू आणि बहुमत सिद्ध करू. आगे आगे देखो होता है क्या असं मी म्हणेल, अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली ( neelam gorhe react on mahavikas aghadi floor test ) आहे.

neelam gorhe
neelam gorhe

By

Published : Jun 29, 2022, 9:58 AM IST

पुणे -शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं ( Maharashtra Political Crisis ) आहे. शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडतं आहे. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने सरकार टिकेल की नाही यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. यावर आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ( Neelam Gorhe React On Mahavikas Aghadi Floor Test ) आहे.

नीलम गोऱ्हे यांना पत्रकारांनी सरकार बहुमत चाचणीमध्ये टिकेल की नाही, असा प्रश्न विचारला होता. त्यावर गोऱ्हे यांनी सांगितलं की, आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही नक्की टिकू आणि बहुमत सिद्ध करू. आगे आगे देखो होता है क्या असं मी म्हणेल.

नीलम गोऱ्हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

शिवसेनेचे बंडखोर आमदार खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत आहे. त्यावर गोऱ्हेंना विचारलं असता, त्यांनी म्हटलं, सगळ्याचं मैत्रीपूर्ण संबंध आहे. एकमेकांशी हसत खेळत ते राहिले आहे. जर एखाद्या मित्राशी पटत नसेल तर लगेच एवढं रंगवायचं नसत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतःचे निर्णय हे स्वतः हा घेत असतात. ते कोणाचंही ऐकत नाही. जेव्हा काही चुकत तेव्हाही ती जबाबदारी ते स्वतः हा घेत असतात. त्यामुळे पक्षप्रमुख हे कोणाचं एकतात कोणाचं नाही हे म्हणणं देखील चुकीचं आहे. हे जे कोणी सांगत आहे, त्यांचे मतभेद नव्हे तर मनभेद झालं आहे, असं देखली गोऱ्हे यांनी सांगितलं.

"पक्ष विविध भागांनी बनलेला असतो" - सध्या शिवसेनेच्या वतीने जे मेळावे घेतले जात आहे. ते मेळावे येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी घेतले जात आहे. आत्ता उभी फूट उभी फूट म्हटलं जात आहे. पण, विधिमंडळातील काही आमदारांनी बाहेर जायची इच्छा व्यक्ती केली आहे. अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही. पक्ष हा विविध भागांनी बनलेला असतो. प्रत्येकाची वेगवेगळी रचना असते. विधिमंडळात अजूनही सिद्ध व्हायच की कोणाकडे किती बहुमत आहे. सगळीकडे दिशाभूल करण्याचा बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहे. त्या बातम्या विश्वासार्थी नाहीत, असेही गोऱ्हे यांनी म्हटलं.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details