पुणे -मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Leader Raj Thackeray ) यांनी भोंग्यांच्या ( loudspeaker ) संदर्भात दिलेल्या सुचनेनुसार, आज पुण्यात मनसेच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( MNS workers meet pune police commissioner ) यांची भेट घेतली. व त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे ( MNS Leader Vasant More ) यांनी जोपर्यंत राज ठाकरे हे पक्ष कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत मी कार्यालयात जाणार नाही असा निर्धार केला आहे.
मुंबई पोलिसांप्रमाणे पुणे पोलिसांनी देखील पत्र काढावे - पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र देण्यात आलं आहे. भोंग्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी एक पत्र काढले आहे. तसेच पत्र पुणे पोलिसांनी काढावे. तसेच सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहे त्या आदेशानुसार हे पत्र असून असच पत्र पुणे पोलिसांनी काढावे. शहरातील कुठल्या भागात कसा आवाज असणार या पत्रात उल्लेख असावा. अशी मागणी आम्ही पत्राद्वारे पुणे पोलिसांना केली आहे, अशी माहिती यावेळी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे.
अन्यथा आम्ही निर्णय घेऊ -येत्या 10 दिवसात पुणे पोलीस आम्हाला माहिती देतो असे त्यांनी म्हटले आहे. जर अश्या पद्धतीची माहिती नाही दिली तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ असे देखील यावेळी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी म्हटले आहे. तसेच आज देण्यात आलेल्या निवेदनात पक्षातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. आमच्यात कोणतेही वाद नाही असे देखील यावेळी बाबर म्हणाले.