महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra rainfall : राज्यात सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याची शक्यता - डॉ. रामचंद्र साबळे - महाराष्ट्र पाऊस शक्यता रामचंद्र साबळे

हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे ( Dr. Ramchandra Sable ) यांनी माहिती दिली असून, या वर्षी संपूर्ण मान्सून काळात सरासरी 101 टक्के चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज ( Maharashtra average rainfall news ) त्यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra raifall news
महाराष्ट्र पाऊस शक्यता रामचंद्र साबळे

By

Published : Jun 2, 2022, 8:38 AM IST

पुणे - यंदा मान्सून जरी एक आठवडा आधी आले असले आणि केरळमध्ये दाखल झाला असला तरी राज्यात कधी पाऊस पडणार आणि किती पाऊस पडणार याबाबतची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यावर हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे ( Dr. Ramchandra Sable ) यांनी माहिती दिली असून, या वर्षी संपूर्ण मान्सून काळात सरासरी 101 टक्के चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज ( Maharashtra average rainfall news ) त्यांनी व्यक्त केला आहे.

माहिती देताना हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे

हेही वाचा -Vasant More : 'तात्यांची भेट दुर्मिळ झाली'; संजय राऊत आणि वसंत मोरेंमध्ये चर्चा

राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज -भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, साबळे यांनी त्यांच्या मॉडेलचा अंदाज जाहीर केला आहे. त्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

कोणत्या विभागात किती पाऊस पडणार -राज्यातील पश्चिम विदर्भ विभागात 100 टक्के, तर मध्य विदर्भ विभागात 101 टक्के, पूर्व विदर्भ विभागात 103 टक्के, मराठवाडा विभागात 100 टक्के, कोकण विभागात 100 टक्के, उत्तर महाराष्ट्र विभागात 100.6 टक्के आणि पश्विम महाराष्ट्र विभागात 100.3 टक्के पाऊस पडणार, असा अंदाज यावेळी साबळे यांनी व्यक्त केला.

जून मध्ये कमी पाऊस पडणार -या वर्षी वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने जूनमध्ये पाऊस कमी राहणार आहे. तसेच, राज्यातील ८४ ठिकाणी नोंदविण्यात आलेला कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग व सूर्यप्रकाशाचा कालावाधी या घटकांचा अभ्यास केल्यानंतर राज्यात १०१ टक्के पावसाची शक्यता साबळे यांनी वर्तवली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार -यंदा वाऱ्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. तसेच, कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड, असे हवामान राहण्याची शक्यता असल्याचेही साबळे यांनी सांगितले.

पेरणीची घाई करू नये -जूनमध्ये पाऊस कमी पडणार असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीत ६५ मिलिमीटर म्हणजेच अडीच ते तीन फुट ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये असे देखील साबळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्याशिवाय कापूस व सोयाबीनची लागवड करण्याची घाई करू नये. जिरायती शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची लागवड करणे फायद्याचे ठरणार असल्याचे साबळे म्हणाले.

पीक बदल करून नियोजन गरजेचे -राज्यात गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये पावसात खंड पडत आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत आहे. गेले दोन वर्षे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत महापूर आले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रसुद्धा आता हवामान बदलाला प्रवण राज्य झाले आहे. त्यादृष्टीने पीक बदल करायला हवा व नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -Anil Parab Replied To Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमैयांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही - अनिल परब

ABOUT THE AUTHOR

...view details