पुणे - राज्य सरकारने कुटुंब नियोजनासाठी एक नवीन निर्णय घेतला आहे. देशातील वाढती लोकसंख्या हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो अनेक उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग देखील अनेक उपाय योजना राबवताना दिसत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनासाठी देखील अनेक उपक्रम हाती घेतले जातात. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने मात्र राज्यात मोठा गदारोळ सुरू झाला आहे.
काय आहे राज्य सरकारचा नवीन निर्णय?
राज्य सरकारचा आरोग्य विभाग कुटुंब नियोजनाच्या समुपदेशनासाठी ज्या योजना राबवत त्या साठी राज्यातील आशा वर्कर्सचा समावेश असतो. मात्र, आता राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे समोर ( Maharashtra govt adds rubber dildos in family planning kits ) आले आहे. सरकारच्या याच निर्णयाने एकच खळबळ उडालेली आहे.
कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये चक्करबरी लिंग-
राज्यातील आशा सेविका अनेक खेड्यापाड्यात जाऊन कुटुंब नियोजनासाठी महिलांचे समुपदेशन करत असतात. मात्र आता राज्य सरकारकडून आशा सेविकांना देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटमध्ये चक्क रबरी लिंग देण्यात आले आहे. मात्र यामुळे आशा सेविकांसमोर समोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. हे रबरी लिंग प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्या किटमध्ये देण्यात आले आहे. आशा सेविकांना ते रबरी लिंग घेऊन गावागावात फिरायचे कसे? असा प्रश्न पडला आहे.
हेही वाचा -रबरी लिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले, दोषींवर कारवाई होईल - पालकमंत्री राजेंद्र शिंगणे
आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. तर काहीजण या निर्णयाच्या समर्थनात तर काहीजण विरोधात जाताना पाहायला मिळत आहे.