पुणे - शिक्षक पात्रता परिक्षा ( टीईटी ) पेपरफुटी ( TET Exam Scam ) प्रकरणात कोणीही असू द्या, त्याचे धागेदोरे कितीही वर पर्यंत जाऊ द्या. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देत, आमच्या मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. मलाही ही नाही तुम्हालाही नाही. जी परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून रुजवली गेली. त्याचं रस्त्याने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Enviroment Minister Aditya Thackeray ), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) आदी मान्यवर उपस्थित होते. तेव्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, टीईटी पेपरफुटी संदर्भात पुणे पोलिसांचा तपास आयुक्त अमिताभ गुप्ता ( Pune Police Commissioner Amitabh Gupta ) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय योग्य पद्धतीने चालला आहे. ते या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याचा तपास करतील, अशी माझ्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सरकारला पूर्ण खात्री आहे.
"... कोणीही असो, दोषींवर कारवाई करणार" - अजित पवार सुशांत राजपूतच्या प्रकरणात काय झालं?
सीबीआय ला भरपूर कामे आहेत. जेव्हा एखादी यंत्रणा योग्य पध्दतीने तपास करत नाही, तेव्हा गोष्ट वेगळी आहे. मात्र, पुणे पोलिस यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. सीबीआयला पाठीमागे दोन, तीन तपास दिले होते. सुशांत राजपूतच्या प्रकरणाच ( Sushant Singh Rajput Case ) काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. कारण नसताना एखाद्या प्रकरणात असा आभास निर्माण केला जातो की ही यंत्रणा योग्य तपास करत नाही म्हणून त्या तपास यंत्रणेला तपास द्या. आम्हाला जेव्हा वाटेल की एखाद्या यंत्रणेला तपास द्यावा तेव्हा तपास देऊ, असं मत अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी व्यक्त केलं.
संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे
पेपरफुटी प्रकरणात ( Tet Exam Scam ) कोणीही असू द्या, त्याचे धागेदोरे कितीही वर पर्यंत जाऊ द्या. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देत, आमच्या मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. मलाही ही नाही तुम्हालाही नाही. जी परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून रुजवली गेली. त्याचं रस्त्याने पुढे जाण्याचा आणि तो दृष्टीकोन जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाच्याही काळात हे प्रकरण झाले असेल त्यांच्यावर कारवाई झाली, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी सांगितले.
हेही वाचा -Sword Seized in Malegaon : मोमीनपुऱ्यातून ३० धारदार तलवारी जप्त; मोठा कट उधळला?