पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने आज ४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच माघ शुद्ध चतुर्थी यानिमित्ता गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत आळंदी येथील संत परंपरा असलेले प्रसिद्ध कीर्तनकार अवधूत गांधी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केले. यावेळी त्यांनी स्वराभिषेकातून हरिनामाचा गजर, अभंग, भजन, शाहिरी गण, डफया, गोंधळ, गवळण आणि भैरवी या विविध प्रकारची गीते सादर केली.
माघी गणेश जयंती : दगडूशेठ गणपतीला सकाळी स्वराभिषेक; जाणून घ्या माघी गणेश जयंतीचे महत्त्व - Dagdusheth Ganapati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने आज ४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच माघ शुद्ध चतुर्थी यानिमित्ता गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. मंदिराला कामधेनू गायीचे आकर्षक सजावटीचा फुलांची आरास व विद्युतरोषणाई साकारली आहे.
![माघी गणेश जयंती : दगडूशेठ गणपतीला सकाळी स्वराभिषेक; जाणून घ्या माघी गणेश जयंतीचे महत्त्व Maghi Ganesh Jayanti](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14368369-755-14368369-1643957979373.jpg)
माघी गणेश जयंती
दगडूशेठ गणपतीला सकाळी स्वराभिषेक; जाणून घ्या माघी गणेश जयंतीचे महत्त्व
दिवसभर कार्यक्रम -
मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता सुरू झाला आहे. नगर प्रदक्षिणा सायंकाळी ६.३० वाजता श्रीं ची मंगल आरती रात्री ८. वाजता तर, रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे.
यंदा ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक ,स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मंदिराला कामधेनू गायीचे आकर्षक सजावटीचा फुलांची आरास व विद्युतरोषणाई साकारली आहे.
Last Updated : Feb 4, 2022, 1:53 PM IST