महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माधुरी मिसाळ यांची पुणे भाजप शराध्यक्षपदी निवड

पुणे भाजपचे सध्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या जागी माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माधुरी मिसाळ यांच्याकडे शहराध्यक्ष पद दिल्याने पुणे भाजपमधील राजकीय घडामोडीना वेग आला आहे.

By

Published : Aug 20, 2019, 8:23 AM IST

माधुरी मिसाळ

पुणे-भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष पदाची माळ पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या गळ्यात पडली आहे. पुणे भाजप पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला पदाधिकाऱ्याला शहराध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे.

पुणे भाजपचे सध्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या जागी माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माधुरी मिसाळ या 2007 मध्ये पहिल्यांदा भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये पर्वती मतदारसंघातून त्या आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. तसेच 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्या पर्वती मतदारसंघातून निवडुन आल्या आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी

माधुरी मिसाळ यांच्याकडे शहराध्यक्ष पद दिल्याने पुणे भाजपमधील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले हे विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. आता माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे भाजपला आगामी विधानसभेची तयारी करायची आहे. पुणे शहरातल्या आठ मतदारसंघात भाजपची मजबूत पकड आहे. मात्र, पक्षांतर्गत एकेका मतदारसंघामध्ये अनेक इच्छुकांची मांदियाळी आहे. त्यामुळे शहराध्यक्ष म्हणून मिसाळ यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details