पुणे -भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमीचे पुण्यात आगमन होत आहे. धोनी क्रिकेट अकॅडमी पुण्यातील अग्रगण्य क्रिकेट मास्टर्स अकॅडमीसोबत संलग्न झाली आहे. क्रिकेट मास्टर्स अकॅडमी आणि धोनी क्रिकेट अकॅडमी एकत्रितपणे पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाले असून या अकॅडमित 1 जानेवारी 2021पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे, अशी माहिती महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमीचे संचालक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेरील कलीनन यांनी दिली.
आधुनिक पद्धतीने सराव आणि सर्वत्तम प्रशिक्षण
सध्याच्या स्पर्धात्मक क्रिकेटयुगात पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना जास्तीत-जास्त आधुनिक पद्धतीने सराव मिळावा आणि सोबतच क्रिकेटमधल्या नवनवीन पद्धतीने सर्वत्तम प्रशिक्षण मिळावे, म्हणून क्रिकेट मास्टर्स अकॅडमी आणि एम. एस. धोनी क्रिकेट अकॅडमीच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती ही यावेळी कलीनन यांनी दिली.