महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अजित पवार म्हणतात... मी त्याचा बाप आहे - पार्थ पवार

पार्थ पवार हे लोकसभेला शहरात दिसत होते. आता मात्र, विधानसभेला सक्रिय नाहीत, असा प्रश्न विचारताच संतापलेले अजित पवार म्हणाले की, ही पत्रकार परिषद पवार घराण्याची चर्चा करण्यासाठी नाही. आम्ही आमच्या घरातल्यांचे काय करायचं ते करू. पक्षाचे अधिकृत उमेदवार, आम्ही केलेले पुरस्कृत उमेदवार, आमचा शपथनामा किंवा सत्ताधारी असलेल्या व्यक्तींबद्दल घेतलेली भूमिका याबद्दलची चर्चा करा. यावर पार्थने लोकसभेलाच यावे आणि विधानसभेला येऊ नये, यात गैर काय आहे? असे पत्रकार म्हणताच पार्थ पवार यांनी येऊ नये असे मला वाटते. मी त्याचा बाप आहे, असे पवार म्हणाले. त्यानंतरस्वतः अजित पवार हसले आणि कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.

अजित पवार

By

Published : Oct 10, 2019, 9:39 AM IST

पुणे- पार्थचा मी बाप आहे. त्याने विधानसभेला येऊ नये, असे मला वाटते. आम्ही आमच्या घरातील काय करायचे ते करू, तुम्ही पक्षासंबंधी चर्चा करा, असे वक्तव्य संतापाच्या भरात अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. मात्र, त्यानंतर स्वतः पवार हसले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पार्थ फक्त लोकसभेच्यावेळी फिरत होते. आता विधानसभेला ते दिसत का नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवारांनी हे विधान केले.

...अन् मी त्याचा बाप आहे - अजित पवार

हेही वाचा - 'हे' दृश्य पाहून शरद पवारही विचारात पडले असतील

पार्थ पवार हे लोकसभेला शहरात दिसत होते. आता मात्र, विधानसभेला सक्रिय नाहीत, असा प्रश्न विचारताच संतापलेले अजित पवार म्हणाले की, ही पत्रकार परिषद पवार घराण्याची चर्चा करण्यासाठी नाही. आम्ही आमच्या घरातील काय करायचं ते करू. पक्षाचे अधिकृत उमेदवार, आम्ही केलेले पुरस्कृत उमेदवार, आमचा शपथनामा किंवा सत्ताधारी असलेल्या व्यक्तींबद्दल घेतलेली भूमिका याबद्दलची चर्चा करा. यावर पार्थने लोकसभेलाच यावे आणि विधानसभेला येऊ नये, यात गैर काय आहे? असे विचारताच, पार्थ पवार यांनी येऊ नये असे मला वाटते. मी त्याचा बाप आहे, असे पवार म्हणाले. त्यानंतर स्वतः अजित पवार हसले आणि कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.

हेही वाचा - 'भागवतांवर देशात बॉम्बस्फोट घडविल्याचा आरोप; त्याची साधी चौकशीही नाही'

दरम्यान, अजित पवार हे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आले होते. प्रशांत शितोळेवर अन्याय झाला मात्र, त्यांना कुठेतरी संधी देईल, सामावून घेईल. सर्वच कार्यकर्ते जिवाभावाचे आहेत. सर्वच इच्छुक चांगले होते. मात्र, जागा एकच होती. यात कोणी गैरसमज करण्याचे काम नाही. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे, राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना निवडून आणण्यासाठी आमची सर्व ताकद लावू, असे म्हणत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांना राष्ट्रवादी पुरस्कृत पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले.

ABOUT THE AUTHOR

...view details