महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सरकार स्थापन कधी होणार अन् मदत कधी मिळणार.. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा नेत्यांना सवाल' - मांडगण फराटा येथे टोम‌ॅटो पिकाचे नुकसान

मुलाबाळाप्रमाणे जपलेली टोम‌ॅटोची शेती पाण्यात गेली.. लाखोंचे नुकसान झाले, आता ही नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार, हा प्रश्न शिरूर तालुक्यातील पंडितराव फराटे यांना पडला आहे.

परतीच्या पावसाने टोम‌ॅटो पिकाचे मोठे नुकसान

By

Published : Nov 16, 2019, 9:19 PM IST

पुणे -शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकवलेली शेतातील पिके परतीच्या पावसाने पुर्णपणे वाया गेली. शिरुर तालुक्यातील मांडगण फराटा येथील शेतकरी पंडितराव फराटे यांना आपल्याच शेतात डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. फराटे यांच्या पाच एकरातील टोम‌ॅटो पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

शिरूर तालुक्यातील मांडगण फराटा येथे परतीच्या पावसाने टोम‌ॅटो पिकाचे मोठे नुकसान...

हेही वाचा... नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले

राज्यात सध्या सत्ता स्थापनेसाठी प्रत्येक राजकीय नेता रोज वेगवेगळे डावपेच खेळत आहे. मात्र दिवसरात्र कष्ट करून पिकवलेली शेती अवकाळी पावसाने मात्र एका डावात उद्ध्वस्त केली. त्यामुळे जिवनमरणाचा प्रश्न उपस्थीत झालेल्या शेतकऱ्यांना आपल्याला नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार यांची चिंता भासत आहे.

हेही वाचा... मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मालवाहू जीप-कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील पंडितराव फराटे यांनी पाच एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, टोमॅटो काढणीला आला असता, परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि टोमॅटोचे पीक पाण्याखाली गेले. पाच एकर शेतीमध्ये पाच लाख रुपये खर्च करून त्यांनी ही टोमॅटोची लागवड केली होती. मात्र परतीच्या पावसाने उभे पीक वाया गेल्याने मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेली नुकसान भरपाई, कशी मिळणार याची चिंता आहे.

हेही वाचा... दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरी जबाबदार नाही, शेतजमीन जाळल्याने होताहेत आरोप

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details