महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोणावळा येथील 'भुशी डॅम ओव्हर फ्लो'...पर्यटकांना मात्र बंदी! - Lonavla Bhushi Dam overflow

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी लोणावळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार असला तरी भुशी धरणावर शांतता आहे.

Bhushi Dam Lonavla
लोणावळा येथील भुशी ड‌ॅम ओव्हरफ्लो

By

Published : Jul 4, 2020, 10:44 PM IST

मावळ (पुणे) -मावळ तालुक्यातील लोणावळा येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि पावसाळी पर्यटकांचे खास आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. धरण भरल्यामुळे धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी लोणावळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे धरण भरले असले तरिही शनिवार-रविवार असूनही भुशी धरणावर शांतता दिसत आहे.

लोणावळा परिसरात मागली काही दिवसांपासून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरवर्षी हजारो पर्यटक भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट पाहत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षाविहार करण्यासाठी पर्यटकांना सक्त मनाई आहे. स्वतः जिल्ह्याधिकारी नवलकिशोर राम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच नियमांची पायमल्ली करत वर्षा विहारासाठी पर्यटक आल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. असे लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुशी धरण परिसरात शांतता पाहायला मिळत आहे.

पर्यटकांचे खास आकर्षण असलेले लोणावळा येथील 'भुशी धरण ओव्हरफ्लो'...

हेही वाचा -पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा नजीक असलेले हे धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट पर्यटक पाहत असतात. परंतु, यावर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लोणावळा परिसरात पर्यटकांना बंदी आहे. दरम्यान, जून महिन्यापासून लोणावळा परिसरात आतापर्यंत 649 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे आज (शनिवार) दुपारीच भुशी धरण तुडुंब भरले.

ABOUT THE AUTHOR

...view details