पुणे - पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाला आहे. ४ दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणातील पाणी पातळी वाढली आहे. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने आज (सोमवार) भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.
भुशी धरण ओव्हर-फ्लो; लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी - लोणावळा
भुशी डॅमची पाणी पातळी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा मध्ये दाखल होत आहेत. रविवारी दिवसभर पुणे आणि मुंबई येथील पर्यटकांनी धब-धब्यांचा आनंद लुटला.
भुशी डॅमची पाणी पातळी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा मध्ये दाखल होत आहेत. रविवारी दिवसभर पुणे आणि मुंबई येथील पर्यटकांनी धब-धब्यांचा आनंद लुटला. सुट्टी असल्याने अनेकजण कुटुंबासमवेत पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा परिसरात दाखल झाले होते.
मुंबई-पुण्याचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भूशी धरण कधी ओव्हर-फ्लो होईल याची वाट दरवर्षी पाहतात. रविवार आणि शनिवारी मुंबई-पुणे या दृतगती महा-मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू असते. या पावसामुळे पर्यटकांना चांगली मज्जा येत आहे. भुशी धरणाच्या सांडव्यावरुन पायऱ्यांवर पाणी ओसंडून वाहू लागल्याने उपस्थित पर्यटकांनी एकच जल्लोष केला.