महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray rally Pune : तुम्ही सत्तेत असताना औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

Raj Thackeray rally live updates
राज ठाकरे सभा लाईव्ह अपडेट

By

Published : May 22, 2022, 10:14 AM IST

Updated : May 22, 2022, 12:29 PM IST

12:05 May 22

कायदा सांगणाऱ्या लोकांना नोटीस आणि कायदे न पाळणाऱ्यांबरोबर चर्चा

भोग्याचे आंदोलन एका दिवसाचे नाही, ते चालू राहणार. ही बाब विसरले की पुन्हा सुरू होणार. एकदाचे हे बंद व्हायला पाहिजे. भोंग्यांच्या प्रकरणात 28 हजार मुलांना नोटीस गेल्या. कायदा सांगणाऱ्या लोकांना नोटीस आणि कायदे न पाळणाऱ्यांबरोबर चर्चा. या आंदोलनासाठी मी कार्यकार्त्यांचे आभार मानतो. आंदोलने होत राहतील, काळजी नसावी, टीम तयार आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर, बरे झाल्यानंतर महिना दिड महिन्यांनी परत तुमच्यासमोर येईल, तुर्तास हे आंदोलन आपल्याला सुरू ठेवायचे आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाषण संपवले.

12:02 May 22

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळच्या अजान बंद झाल्या

अफझल खानच्या कबरीसाठी फंडींग देणारी माणसे कोण? याचे कारण आपण शांत आहोत आणि आपल्याला पर्वा नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळच्या अजान बंद झाल्या. आवाज कमी झाला. माझी मागणी भोंगे काढण्याची आहे, मात्र तुम्ही बेपर्वाह राहणार तर असेच होत राहणार. शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्याची समस्या, औरंगजेबच्या कबरीवर कोणी फुलं टाकतो, मात्र आम्ही शांत. याबाबत राग न येण्याने परकीयांनी 900 वर्षे सत्ता गाजवली. 1947 साली ही भूमी स्वतंत्र झाली. ही मंडळी आतमध्ये घुसलीच कशी? कारण आम्ही बेसावध होतो. आपण फक्त मोबाईल बघतो, असे राज ठाकरे म्हणाले.

11:58 May 22

तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताहेत

महाविकास आघाडी सरकार पाहिले असते तर बाळासाहेबांना आनंद झाला असता असा एक शिवसैनिक म्हणाला. तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताहेत. लोकांना हे खोटे भांडत होते, असे वाटेल. मात्र, हे सत्तेत मशगूल आहेत, यांना परवा नाही, कारण जनता बेपर्वा वागते. निवडणुकीवेळी ती विसरून जाते. त्यामुळे, काहीही झाले तरी निवडून येऊ, असे नेत्यांना वाटते. एमआयएमच्या मानसाच्या कृतीने महाराष्ट्र खवळेल असे वाटले, मात्र असे काही झाले नाही, अशी नाराजीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

11:57 May 22

राजकारणासाठी एमआयएमला मोठे केले

औरंगाबादचे नाव बदला ही मोदींना विनंती. सत्ताधाऱ्यांनी राजकारणासाठी एमआयएमला मोठे केले. आपण एक राक्षस वाढवतो हे त्यांच्या लक्षात आले नाही. राज्यात एक खासदार निवडून आला. या निझामाच्या औलादी येथे येऊ लागल्या. यांच्या राजकारणामुळे हे झाले. आणि आमच्याच राज्यात एमआयएमचा व्यक्ती औरंगजेबच्या कबरीवर डोके टेकवतो. सत्ता धाऱ्यांना लाज वाटत नाही, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

11:54 May 22

बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही का?

आपले लोक रेल्वे स्टेशनवर उत्तर भारतीयांशी बोलायले गेले. तेथे एका व्यक्तीने कार्यकर्त्याला आईची शिवी दिली. येथून प्रकरण सुरू झाले. महाराष्ट्रात रेल्वे भरती होती याची माहिती राज्यातील लोकांना माहिती नाही. त्याच्या जाहिराती यूपी, बिहारमध्ये येत होत्या. त्याबद्दल बोलायचे नाही का? हा मुद्दा होता. ममता यांनी रेल्वे परीक्षा स्थानिक भाषात होणार असे सांगितले आणि त्यानंतर राज्यातील मुलांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या, हे मनसेच्या आंदोलनाचे यश आहे. टोल नाक्याचे आंदोलन हाती घेतले. 970 टोल नाके बंद झाले. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही का? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

11:52 May 22

तुम्ही सत्तेत असताना संभाजीनगरचा प्रश्न का नाही मिटवला?

मुख्यमंत्र्यांची सभा झाली. तो पोरकटपणा होता. खरे हिंदुत्व काय याचे निकाल लोकांना हवे, ते आम्ही त्यांना देतो. रझा अकादमीच्या लोकांनी आपल्या मातांवर हात टाकला त्याच्या विरोधातील मोर्चा हा मनसेने काढला होता, बाकी कोणी काढला नाही, कोणते हिंदुत्व सांगता तुम्ही. उद्धव ठाकरे तुमच्या आंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का? कुठलीच भूमिका नाही. संभाजीनगरवर बोलता, अरे तुम्ही कोण बोलणारे? तुम्ही सत्तेत असताना संभाजीनगरचा प्रश्न मिटवला? तुम्हाला ते मतांसाठी राखून ठेवायचा होते, अशी टीका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

11:46 May 22

ज्या लोकांमुळे राडा झाला त्या लोकांबरोबर शिवसेनेचे लोक जेवत आहेत, हे सर्व ढोंगी

राज ठाकरेंनी माफी मागावी याची आठवण आता आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. गुजरातमध्ये एका मुलीचा बलात्कार झाला. उत्तर भारतीय लोकांना हाकलून लावण्यात आले. ती लोक मुंबईत आली, नंतर यूपीत गेली, यासाठी अल्पेश ठाकोरकडून माफी घेणार का? तुम्ही हे राजकारण समजून घ्या. मशिदीत बांग जोरात झाली तर भोंगे लावा असे म्हटले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीत गेले. मातोश्री काय मशीद आहे काय? त्यांना अटक झाली, ते परत एकत्र आले. शिवसेनेकडून वाट्टेल ते बोलण्यात आले. हा राडा पाहिल्यानंतर हे दाम्पत्य आणि संजय राऊत जेवताना दिसले. शिवसैनिकांना काहीच वाटत नाही का? ज्या लोकांमुळे राडा झाला त्या लोकांबरोबर शिवसेनेचे लोक जेवत आहेत. हे सर्व ढोंगी आहे. यांचे हिंदुत्व खोटे आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

11:42 May 22

हा ट्रॅप होता

आयोध्येला जायची तारीख घोषित केली. आयोध्येला येऊ देणार नाही अशी वक्तव्ये झालीत. मी सर्व पाहात होतो. नंतर लक्षात आले की हा सापळा आहे. यात पडायला नको. या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. पुन्हा विषय बाहेर काढण्याचा कट झाला. माझा दौरा अनेकांना खुपला. नंतर कट झाला. अयोध्येला जायचा विचार होता तो दर्शनासाठी. ज्या वेळी कारसेवकांना ठार मारण्यात आले, त्यांची प्रेत नदीत तरंगतानाची व्हिज्यूअल्स मी पाहिली होती. या कारसेवकांना मारले गेले. जिथे त्यांना मारले त्या जागेचे दर्शन घ्यायचे होते, मात्र ती भावना राजकारण्यांना कळली नाही. मी हट्टाने जायचे ठरवले असेत, जर काही झाले असते, तर केसेस टाकले असते आणि राज्याच्या निवडणुकीसाठी कोणी कार्यकर्तेच उरले नसते. हा ट्रॅप होता. असे होऊ द्यायचे नव्हते, असे राज ठाकरे आयोध्या दौरा रद्द करण्यावर म्हणाले.

11:38 May 22

अनेकांना दौरा रद्द झाल्याचा राग आला

आयोध्या दौरा तुर्तास रद्द, यावर बोलण्यासाठी सभा. अनेकांना दौरा रद्द झाल्याचा राग आला. त्यामुळे, लोकांना बोलण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला. आणि मग भूमिका सांगण्यासाठी सभा ठेवली, असे राज ठाकरे म्हणाले.

11:34 May 22

1 तारखेला हिपबोनची शस्त्रक्रिया होणार - राज ठाकरे

पायाचे दुखणे चालू आहे, कमरेला त्रास होतो, उपचारासाठी मुंबईला गेलो. प्रकरण वाढल्याने 1 तारखेला हिपबोनची शस्त्रक्रिया होणार आहे. कोणाला न सांगता गेलो तर पत्रकार कुठलाही अवयव काढतात.

11:34 May 22

11:26 May 22

अंध विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बसवले

पुणे - राज ठाकरेंनी अंध विद्यार्थ्यांना व्यासपीठावर आणले व त्यांना व्यासपीठावर बसवले.

11:24 May 22

राज ठाकरे सभास्थळी दाखल

पुणे - राज ठाकरे सभास्थळी दाखल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला केले पुष्पार्पण.

11:20 May 22

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा सत्कार

पुणे - राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा सत्कार.

11:15 May 22

राज ठाकरे यांच्या सभेला वसंत मोरे उपस्थित

पुणे - राज ठाकरे यांच्या सभेला माजी पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची उपस्थिती.

11:03 May 22

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेसाठी रवाना

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेसाठी रवाना. गणेश कला क्रिडा मंचाकडे ते निघाले आहेत. येथे त्यांची सभा होणार आहे.

10:58 May 22

राज ठाकरे यांच्या सभेत मनसे नेत्यांच्या भाषणाला सुरुवात

पुणे -राज ठाकरे यांच्या सभेत मनसे नेत्यांच्या भाषणाला सुरुवात.

10:37 May 22

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी वसंत मोरे यांची बाईक रॅली

पुणे -राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी वसंत मोरे यांची पुण्यात बाईक रॅली झाली. वसंत मोरे हे माजी पुणे मनसे शहराध्यक्ष आहेत. मस्जिदवरील भोंग्याबाबत राज ठाकरे यांच्या भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ते चर्चेत आले.

10:33 May 22

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासह अनेक मुद्द्यांवर बोलणार - साईनाथ बाबर

पुणे -आजच्या रॅलीला 10 ते 15 हजार लोक उपस्थित राहतील, अशी आमची अपेक्षा आहे. राज ठाकरे त्यांच्या अयोध्या दौऱ्यासह अनेक मुद्द्यांवर बोलणार आहेत, असे मनसेचे पुणे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी एएनआयला सांगितले.

10:28 May 22

राज ठाकरेंच्या सभेला अटी शर्थींसह परवानगी

पुणे -राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला पोलिसांनी काही अटी शर्थींवर परवानगी दिली आहे. धार्मिक भावना दुखावणारी, तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध अटी पोलिसांनी घातल्या आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करू नये, तसेच सभेला येणाऱ्यांनी सभेला येताना किंवा सभा संपल्यानंतर वाहन फेऱ्या काढू नयेत, यासह विविध अटींवर सभेला परवानगी देण्यात आली आहे.

10:01 May 22

पुण्यात राज ठाकरे यांची जाहीर सभा

पुणे -पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते जमायला लागले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद नंतर राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा आहे. सभेला अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे.

Last Updated : May 22, 2022, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details