पुणे - मार्च २०१९ मध्ये झालेल्या (TET)परिक्षेचा निकाल २०२० ला लागला होता. त्यामधे १६,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. २०२१ मध्ये घोटाळा उघड झाला. ( List of Students in TET Exam Scam ) यात ७ हजार ८८० विद्यार्थी यात संशयित विद्यार्थ्य्यांची यादी रद्द केली. त्यांची संपादणूक रद्द केली. २९३ जणांना बनावट प्रमाणपत्र दिले गेले होते. पुणे सायबर पोलिसांकडून ही माहिती आली यातून विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली गेली आहे.
टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली : या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असून, यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
हीना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून, २०२० मध्ये त्या अपात्र आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोघींच्या नावांचा समावेश आहे. उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत.