पुणे -अवकाळी पावसानंतर शहरात आता थंडीचा कडाका (Cold In Maharashtra) वाढू लागला आहे. या वाढत्या थंडीबरोबर पुणे जिल्ह्यातील मद्यपानाचा आकडा (Liquor sale Increase In Pune) देखील वाढताना पाहायला मिळतो आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये मद्यविक्रीमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे.
वाईनच्या विक्रीत 11.4 टक्क्यांनी वाढ -
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा देशी मद्याच्या 3.7, तर विदेशी मद्याची विक्री 4.2 टक्क्यांनी वाढली आहे. इतकेच नव्हे, तर बिअरच्या विक्रीत थेट 16.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच वाईनच्या विक्रीत 11.4 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.