पुणे - महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने राज्यातील रुग्णसंख्या ही वाढत असून, चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. पुणे शहरात ही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
शहरात वाढत आहे दरोरोज 60 ते 70 रुग्ण- तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्यासह शहरात देखील निर्बंध मुक्त करण्यात आले होते. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शहरातही जी दररोज 20 ते 30 रुग्ण आढळून येत होते. तो आकडा आता वाढला असून, आता शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज 60 ते 70 रुग्णांची वाढ ही होत आहे. पुढच्या महिन्याभरात हा रुग्ण वाढीचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली.