पुणे - आंबिल ओढा परिसरातील बांधकामे हटवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली आहे. त्यामुळे आता आंबिल ओढा परिसरात महापालिकेने कारवाई करायचे ठरवल्यास त्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येऊ शकते. विशेष म्हणजे वरिष्ठ न्यायालयात अपील करेपर्यंत तरी अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यास मनाई करण्यात यावी, ही आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची मागणी ही न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता महापालिका कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
'न्यायालयाने स्थगिती उठवली'
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र या विषयी महापालिकेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, न्यायालयाने जरी स्थगिती उठवली असली तरीही लोकांना विश्वासात न घेता कारवाई करू नये अशा सूचना मी आयुक्तांना दिल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे हा विचार करून आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे ते म्हणाले.
'नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कारवाई नाही'