पुणे -स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ( Lokmanya Bal Gangadhar Tilak ) यांची आज जयंती. लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील केसरी वाडा विषयी माहिती पाहूया.. पुण्याच्या केळकर रस्त्यावर नारायण पेठ येथे आहे केसरी वाडा. पुर्वी हा वाडा गायकवाड वाडा म्हणून ओळखल जात होत. पण पुढे ही वास्तू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या वास्तव्याने केसरी वाडा म्हणून ओळखली जाऊ लागली. हा वाडा लोकमान्य टिळकांनी 1905 साली विकत घेतला. त्यावेळी केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी वृत्तपत्राचे कार्यालयही याच वाड्यात आहे. याच वाड्याला टिळक वाडा अथवा केसरी वाडा असेही म्हणतात.
इ.स. १९०५ मध्ये टिळकांनी खरेदी केला केसरी वाडा -इ.स. १९०५ मध्ये बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड ( Sayajirao Gaikwad ) यांच्याकडून नारायण पेठेतील ( Narayan Peth ) हा वाडा केसरीच्या कचेरीसाठी आणि निवासासाठी लोकमान्य टिळकांनी विकत घेतला. पश्चिमेचा भाग केसरीचे ऑफिस आणि छापखाना व पुर्वेकडील भाग निवास अशी त्याची व्यवस्था केली. मधील मोकळ्या पटांगणात गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विविध सभा, समारंभ आजही होतात. निवासासाठीचा भाग त्यांनी स्वतः आराखडा तयार करुन आपल्या सोईप्रमाणे बांधून घेतला. इमारतीच्या डाव्या बाजूच्या खोलीत त्यांची अभ्यासिका आहे. याच अभ्यासिकेतून त्यांनी केसरीचे अग्रलेख संपादीत केले. अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी गाठी, स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरविण्याचे काम याच अभ्यासिकेत झाले.लोकमान्यांच्या हयातीत त्यांच्या समोर बसून तयार केलेला पुर्णाकृती पुतळा या अभ्यासिकेत स्थापित केला आहे. १०० वर्ष जुन्या या वास्तुच्या जिर्णोद्धाराचे काम टिळक कुटुंबियांनी सन २०१९ मध्ये हाती घेतले. पूर्वी जसा होता तसाच वाडा याठिकाणी बांधण्यात आल आहे.
असे आहे केसरी वाडा -केसरी वाड्यात आत आल्या नंतर मध्ये मोकळ पटांगण आहे. या मधल्या मोकळ्या पटांगणात गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विविध सभा, समारंभ आजही होतात. समोर संग्राहलय आहे. संग्रहालयात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरचा टिळकांचा तेजस्वी पूर्णाकृती पुतळा नजरेस पडतो. त्यापुढे गणपतीची धातुमूर्ती आहे. आणि शेजारी जिन्याजवळ 'केसरी'चे जुने छपाईयंत्र ठेवलेले दिसते. हाताने फिरवून केसरीचे पहिले अंक त्या यंत्रावर छापले गेले होते.आणि आजही या ठिकाणी केसरी च वृत्तपत्र छापलं जात आहे.
हेही वाचा -Nanda Khare passed away : ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार नंदा खरे यांचे निधन