पुणे- केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे लेह-लडाखला फायदा होईल, कारण केंद्राकडून मिळणारी संपूर्ण मदत त्यांना मिळेल, असे मत ब्रिगेडियर (नि) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे. सोमवारी मोदी सरकारने कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर ते 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे लेह-लदाखला फायदा होईल- निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन - जम्मू
केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीचा वापर येथील राजकीय पक्ष केवळ काश्मीर खोऱ्यात करीत होते. याचा फायदा जम्मू, उधमपूर, लेह, लदाख यांना होत नव्हता, असे हेमंत महाजन म्हणाले आहेत.
केंद्राकडून एखाद्या राज्याला जेव्हा मदत पुरवली जाते तेव्हा ती राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यात जाणे अपेक्षित असते. जम्मू-काश्मीरच्या बाबतीत मात्र असे होत नव्हते. या राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीचा वापर येथील राजकीय पक्ष केवळ काश्मीर खोऱ्यात करीत होते. याचा फायदा जम्मू, उधमपूर, लेह, लडाख यांना होत नव्हता, असे हेमंत महाजन म्हणाले.
लेह-लडाख अतिशय थंड प्रदेश आहे. येथील नागरिकांना आता केंद्र सरकारच्या मदतीचा फायदा होईल. बाहेर देशात पर्यटनासाठी जाणारे लोक आता लडाखमध्ये जातील. येथील पर्यटन वाढेल आणि येथील नागरिकांचा फायदा होईल, असे ते म्हणाले.