Legislative Council Results : काँग्रेस राष्ट्रीय पक्ष कुठे राहिलाय - चंद्रकांत पाटील - BJP state president Chandrakant Patil
विधानपरिषद निवडणुकांमध्ये (Legislative Council elections) भाजपने मुसंडी मारली. या बद्दल आनंद व्यक्त करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी काॅंग्रेसवर टीका केली. ते म्हणालेकी, काॅंग्रेसने नागपुरची जागा प्रतिष्ठेची केली पण त्यांचे तोड फुटले. बोंबलायला काॅंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कुठे (Where is the Congress National party) राहिलाय.
पुणे: राज्यात चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारली. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यामधून वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या संर्भाने बोलताना सांगीतले कीृ, नागपूर आणि अकोल्याचे निकाल आज लागले. विधानपरिषदच्या 6 पैकी चार जागा या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. यात 2 बिनविरोध तर 2 लढवून जिंकल्या. नागपूरची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली.आम्ही ज्या सिटिंग जागा आहे तिथे बिनविरोध सांगितले होते.पण पण त्यांनी नागपूरची जागा सोडली नाही. जागा प्रतिष्ठेची करूनही त्यांचे तोंड फुटले, कारण उमेदवार हा बाहेरून आणावा लागला. आणि नंतर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणतात पण बोंबलायला काँग्रेस कुठं राष्ट्रीय पक्ष राहिलाय. त्यांचे फक्त 45 खासदार आहेत. अशी टिका चंद्रकांत पाटील यांनी केली.