पुणे - शहरात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना मास्क, सोशल डिस्टनसिंगसाठी सक्ती केली जात आहे. कडक कारवाई देखील केली जात आहे. असे असताना पुणे महापालिकेत नेते मंडळी, कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला आहे.
पुणे महापालिकेत नेतेमंडळी कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा नेतेमंडळीसह कार्यकर्त्यांकडून मोठ्या संख्येने गर्दी -
पुणे शहरात गेल्या 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे.दरोरोज 800 ते 900 रुग्ण पुण्यात सापडत आहे.एकीकडे रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहे.मात्र दुसरीकडे पूणे महापालिकेत आज झालेल्या शिक्षण मंडळ आणि स्थायी समितीच्या निवडणुकीला महापालिकेच्या नेते मंडळीसह कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडविला.मोठ्या संख्येने उपस्थिती तिही विना मास्क...महापालिकेत विजयी उमेदवाराच्या सेलिब्रेशन करताना चक्क विना मास्क फोटो सिलिब्रेशन करतांना दिसले.सर्वसामान्य नागरिकांवर विना मास्क कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या नेते मंडळींवर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होतो.
पुणे महापालिकेत शिक्षण समिती आणि स्थायी समितीचे निवड पार पडली.यावेळी सोशल डिस्टनसिंगचा पूर्ण फज्जा उडालेला पाहायला मिळाला.सेलिब्रेशनसाठी जमलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयक कोणतही नियम पाळले नाही.कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांकडूनच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसला.