पुणे: पुण्यामध्ये पीएफआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनामध्ये (PFI) पाकिस्तान जिंदाबादचे नारे (Slogans of Pakistan Zindabad) देण्यात आले होते. आता, शिवसेना नेते आ.आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, पाकिस्तान जिंदाबाद नारे देण्याची हिंमत झालीच कशी? असा सवाल आदित्य ठाकरे (MLA Aaditya thackeray) यांनी उपस्थित केलाय. मविआच्या अडीच वर्षांत कुणाची अशी हिंमत झाली नाही.
सत्यमेव जयते - आदित्य ठाकरेवेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधामध्ये आज आदित्य ठाकरेयांच्या नेतृत्वाखाली मावळमधील वडगाव येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिंदे सरकारला खोके सरकार म्हणुन हिणवण्यात आले. न्यायव्यवस्था आमच्या सोबत आहे. सत्यमेव जयतेनुसार आम्हाला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळाली आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, पाकीस्तान जिंदाबाद नारे देण्याची हिंमत झालीच कशी? -आदित्य ठाकरे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. जो प्रकल्प महाराष्ट्रात येणं गरजेचं होतं. जो येऊ शकत होता. तो प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रातून एक-एक प्रकल्प बाहेर जात आहेत. शंभर टक्के तळेगावात येणारा प्रकल्प सरकार बदलल्यानंतर पळवलाच कसा ? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकार असतं तर प्रकल्प गेलाच नसता, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेले. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वतः साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.