महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kiran Gosavi : येरवडा कारागृहातून किरण गोसावीला लष्कर पोलिसांनी घेतले ताब्यात - किरण गोसावी येरावडा कारागृह

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये दाखल गुन्हाबाबत किरण गोसावीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर किरण गोसावीकडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार आणखीन चार तरुणांनी पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे आणि वानवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Kiran Gosavi
किरण गोसावी

By

Published : Nov 10, 2021, 8:02 PM IST

पुणे - किरण गोसावीला(Kiran Gosavi) पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात(Farskhana Police Station) नोंद असलेल्या गुन्ह्याबाबत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात अली होती. लगेच आज पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात(Lashkar Police Station Pune) दाखल असलेल्या आणखी एका गुन्ह्याबाबत लष्कर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उद्या त्याला न्यायालयात हजार करण्यात येणार आहे.

  • गोसावी विरोधात पुण्यात चार गुन्हे दाखल आहेत -

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये दाखल गुन्हाबाबत किरण गोसावीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर किरण गोसावीकडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार आणखीन चार तरुणांनी पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे आणि वानवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

हेही वाचा -ParamBir Singh : परमबीर सिंग यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी

  • ड्रग प्रकरणानंतर गोसावी चर्चेत -

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये किरण गोसावीने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांचे पथक किरण गोसावीला अटक करण्यासाठी लखनऊला गेले होते. अखेर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायाधीश आर. के. बाफना भळगट यांनी सुरुवातीला 8 दिवसांची नंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर कोठडीत 1 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर आज त्याला लष्कर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • कोण आहे गोसावी?

क्रुझ ड्रग प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य काही जणांना अटक केली होती. या प्रकरणातच गोसावी याला एनसीबीने साक्षीदार बनवले होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावरून एनसीबीवर जोरदार टीका केली. त्यामुळे गोसावी वादात अडकला. त्यातच त्याच्याविरोधातील काही फसवणुकीचे प्रकरणेही समोर आली आहेत.

  • नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर पुणे पोलीस गोसावीच्या शोधत -

नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांनी गोसावी याचा शोध सुरू केला. गोवासीवर फरासखाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जाहीर केली होती.

  • काय आहे प्रकरण?

किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्याच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्या तरुणाला मलेशियाला पाठवले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फरासखाना पोलीस त्याचा शोध घेत होते.

  • गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलिसांचा संपर्क -

किरण गोसावी याने पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसवले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर होते. आता पालघर पोलीस गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या संपर्कात आहेत.

हेही वाचा -गोसावीच्या सेल्फीमुळे सगळे पैसे गेले; कथित प्रत्यक्षदर्शी विजय पगारेच्या दाव्याने खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details