महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक..! महिला डॉक्टरच्या बेडरूम अन् बाथरूममध्ये सापडले छुपे कॅमेरे, गुन्हा दाखल

पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टराच्या बेडरूम व बाथरूममध्ये अज्ञात व्यक्तीने छुपे कॅमेरे लावल्यचा प्रकार उघडकीस आला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 8, 2021, 7:02 PM IST

पुणे- येथील एका नामांकित रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टराच्या बेडरूम व बाथरूममध्ये अज्ञात व्यक्तीने कॅमेरे लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय डॉक्टर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला या एका नामांकित रुग्णालयात डॉक्टर आहे. भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरातील कॉर्टरमध्ये त्या राहतात. मंगळवारी (दि. 6 जुलै) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. संध्याकाळी जेव्हा त्या कामावरून परत आल्या तेव्हा त्यांना त्यांच्या घरामध्ये काही सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी बारकाईने घराची पाहणी केली असता बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठले तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने बनावट चावीच्या सहायाने लॉक उघडून घरात प्रवेश केला आणि त्यांचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने बाथरूम व बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले. यावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -पुण्यातील वेश्यावस्तीत लसीकरण, 50 टक्के महिला कागदपत्राविना लसीपासून वंचित

ABOUT THE AUTHOR

...view details