पुणे -जगभरातील 170 देशांमध्ये 720 ठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिरात सध्या श्री कृष्ण जन्म महोत्सवाला सुरू असून पुण्यातील कात्रज कोंढवा रोड येथील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी उत्साहात Dahi handi in ISKCON temple धार्मिक कार्यक्रमात साजरी करण्यात आली. गेल्या 10 दिवसांपासून श्रीकृष्ण जन्म महोत्सवाला सुरुवात झाली होती. दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या Shri Krishna Janmashtami 2022 दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. पुण्यातील इस्कॉन मंदिरात धार्मिक कार्यक्रम, पूजा, भजन - कीर्तन आणि प्रसाद अश्या कार्यक्रमांचा आयोजन करून जन्माष्टमी हजारो भाविकांच्या उपस्थित साजरी करण्यात आली.
Krishna Janmashtami 2022 पुण्यातील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी उत्साहात साजरी - इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी उत्साहात साजरी
पुण्यातील कात्रज कोंढवा रोड येथील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी उत्साहात Dahi handi in ISKCON temple धार्मिक कार्यक्रमात साजरी करण्यात आली. गेल्या 10 दिवसांपासून श्रीकृष्ण जन्म महोत्सवाला सुरुवात झाली होती. दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या Shri Krishna Janmashtami 2022 दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी देखील इस्कॉन येथे जन्माष्टमी साजरा करण्यात आली. जन्माष्टमीला आज सकाळी 4 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी 4.30 वाजता आरती झाली. त्यानंतर साडे सात वाजता शृंगार दर्शन झाले आणि मग साडे आठ वाजता श्री कृष्ण कथा आयोजित करण्यात आली होती. ही कथा साडे अकरा वाजेपर्यंत चालली. रात्री 12 पर्यंत जन्माष्टमीच्या दिवशी विविध कार्यक्रम मंदिरात आयोजित केले जातात. जवळपास 1 लाख हून अधिक भाविक हे जन्माष्टीला मंदिरात दर्शनासाठी आले होते.