महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरेगाव भीमा दंगल : भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करणार - गृहमंत्री - शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चार्जशीट प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Home Minister pc
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Jan 1, 2021, 3:33 PM IST

पुणे - कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चार्जशीट प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कारागृहाला भेट दिली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

येरवडा कारागृहाला भेट दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाकडून काही मागण्या होत्या. त्या संदर्भातील निवेदन स्वीकारण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. सद्यस्थितीत येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता वाढविण्यासाठीचे निवेदन दिले आहे. या कारागृहात वेगवेगळ्या प्रकारचे कैदी आहेत. त्यामुळे येरवडा कारागृहाच्या पुनर्रचनेचा विचार करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details