पुणे- पुणे खरेतर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जाते. याच विद्येच्या माहेरघराला भेट देण्यासाठी तृतीयपंथी जोया पुण्यात आली,. भारतातली पहिली तृतीयपंथी फोटो जर्नलिस्ट ( Indias first transgender photo Journalist ) म्हणून तिने या क्षेत्रात आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. तिचा हा प्रवास ईटीव्ही भारतने ( Special interview of Indias first transgender ) जाणून घेतला.
जोया हिने सुरुवातीला एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. तिथूनच तिचा हा प्रवास सुरू झाला. झोयाला सुरुवातीपासूनच संगीताची प्रचंड आवड होती. तिला लहानपणापासूनच व्हायोलिन शिकण्याची खूप इच्छा होती. परंतु परस्थितीने गांजलेली झोया मोठी होताना हे स्वप्न विसरून गेली होती. किन्नरच्या वेशभूषेत मुंबईत रेल्वेत पैसे मागणे आणि आपला उदरनिर्वाह करणे तिचा दिनक्रम होता. एक दिवस पैसे मागत असताना ती एका वाद्यांच्या दुकानात पोहोचली. तिथे व्हायोलिन बघून तिला व्हायोलिन वादक होण्याचे स्वप्न आठवले. तिथे ती व्हायोलिनची किंमत विचारू लागली. परंतु किन्नर असणाऱ्या झोयाला अतिशय हीन प्रकारची वागणूक मिळाली. हे तिच्या जिव्हारी लागले. तिने ठरवले की या दुकानात मी काहीतरी बनून येईल.
झोया ठरली भारतातील पहिली तृतीयपंथी छायचित्र पत्रकार हेही वाचा-Kalicharan Maharaj get Police Custody : कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश
अपमान जिव्हारी लागल्यानंतर सुरू केली पत्रकारिता-
अपमान जिव्हारी लागल्यानंतर झोयाने पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ती एका मुंबईच्या कंपनीत काम करू लागली. मात्र पत्रकारितेत कशा प्रकारे काम करतात तिला माहीत नव्हते. एकदिवस तिने ऑफिसमधीला कॅमेरा बघितला. तिने आपला पहिला कॅमेरा आणि त्यानंतर व्हायोलिन विकत घेतला. हळूहळू कॅमेराच्या लेन्स जमा करत ती फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करू लागली. मात्र, कोरोना काळ हा तिच्यासाठी टर्निग पॉइंट सिद्ध झाला. झोयाला कोरोना काळात एकाने रेशनची मदत देवू केली. तिला खूप भयावह प्रसंगांना सामोरे जावे लागले. परंतु त्या परिस्थितीत तिने आपले कौशल्य दाखवत फोटो काढले. हे फोटो पुढे अनेक वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये प्रसिध्द झाले. यानंतर झोयाची माध्यम क्षेत्रात छायाचित्र पत्रकार ( Indias first transgender photo Journalist) म्हणून ओळख निर्माण झाली. ती मुक्त पत्रकार म्हणून फोटोग्राफी करत आहे.
हेही वाचा-Sanjay Raut Family Corona Positive : संजय राऊत यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण
तृतीयपंथीयही करू शकतात प्रगती-
तृतीयपंथीयांनी पुढे होऊन प्रगती करावी आणि आपली ओळख निर्माण करावी हेच ती सांगू इच्छिते. झोयाला समाजात वावरताना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. त्यावेळी तिला कोणीही मदत केली नाही. मात्र मनातील इच्छा, जिद्द आणि ते पूर्ण करण्याच्या ध्येयाने ती झपाटून निघाली होती. तिच्या या प्रयत्नांच्या परकाष्ठेने ती हा सगळा प्रवास करू शकली असे ती म्हणते. आम्ही वेगळे नाही, आम्ही पण माणूस आहोत. आम्हाला ही जाणीव असतात. मन असते. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी बदलण्याची गरज आहे. तृतीयपंथीही समाजात वावरू शकतात. ते छायाचित्र पत्रकार होऊ शकतात. ते चंद्रावरही पोहोचू शकतात. ते मंगळावरही पोहोचू शकतात. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करू शकतात. मात्र मदतीची व एका साथीची एवढी इच्छा ती प्रगट करते.
हेही वाचा-Narendra Modi In Punjab : तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, मी भटिंडा विमानतळावर जिवंत आलो... मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले